• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर, शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत उन्मेष पाटलांनी दिली मंगेश चव्हाण यांना मात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 10, 2023
in जळगाव
0
Spread the love

जळगाव : भाजप खासदार उन्मेष पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. चाळीसगावातील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत भाजपचे हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात बघायला मिळाले. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, खासदार उन्मेश पाटील गटाचा एकतर्फी विजय झाला आहे.

भाजपच्या आमदार-खासदाराच्या लढाईत खासदार गटाचा विजय झाला. स्मृती पॅनलकडून भाजप खासदार उन्मेश पाटील तर विकास पॅनलकडून भाजप आमदार मंगेश चव्हाण हे आमने-सामने आले होते. स्मृती पॅनलने विकास पॅनलचा दारुण पराभव केला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच सहकार क्षेत्रातल्या निवडणुकीत भाजप पक्षाचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता.

सुरेश जैन यांच्याशी संवाद

गेल्या आठवड्यात भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी माजी मंत्री सुरेश जैन यांना फोन करुन जाब विचारला होता. माजी मंत्री सुरेश जैन यांच्याशी संवाद साधलेले ऑडिओ क्लिप खासदारांच्या अधिकृत सोशल अकाउंटवरून व्हायरल करण्यात आले होते. कारण नसताना आमदार मंगेश चव्हाण मला प्रकरणात इन्व्हॉल करताय, असा आरोप भाजप खासदारांनी केला होता.

व्यवहार केल्याचा खोटा व्हिडीओ

“आमदार मंगेश चव्हाण यांनी मी आणि ते सोबत येऊन तुमच्याशी व्यवहार केला, असा व्हिडिओ तुमच्याकडून तयार केला आहे. मी आणि मंगेश चव्हाण आपल्याकडे व्यवहारासाठी एकत्र कधीही आलो नाही. असा आपण लवकरात लवकर खुलासा करा, अन्यथा मी पत्रकार परिषद घेईल”, असा इशारा खासदार उन्मेश पाटील यांनी फोनवरुन सुरेश जैन यांना दिला होता.

Tags: jalgaon news
Previous Post

शिवसेना कुणाची? सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Next Post

शिवसेना फोडण्याचा कट नेमका कुणाचा? संजय राऊत यांनी सांगितली नावे

Next Post

शिवसेना फोडण्याचा कट नेमका कुणाचा? संजय राऊत यांनी सांगितली नावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!