• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर येथून ३३ लाखांचा संतूर साबण लंपास ; ट्रक चालक-मालकविरुद्ध गुन्हा !

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 11, 2023
in क्राईम
0
Spread the love

अमळनेर : विप्रो कंपनीतून निघालेला ३३ लाखांचा संतूर साबण घेऊन निघालेला ट्रक निर्धारित ठिकाणी न पोहोचल्यामुळे ट्रक चालकाने तब्बल ३३ लाखांचा लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अनिलकुमार माइसुख पुनिया (रा.मंगलमुर्ती चौक, अमळनेर) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, दि. ४ जानेवारी रोजी विप्रो लि. कंपनी, अमळनेर यांच्या कडील १८ टन १०० किलो तयार संतुर साबण तुमकुर (कर्नाटक) येथे पोहचविणे असल्याने नेहमी प्रमाणे मामा ट्रान्सपोर्ट कंपनी (अमळनेर) यांना याबाबतचे काम देण्यात आले. माल भरलेला ट्रक हा चालक कैलास श्रीराम गुर्जर (रा. हर्षलो का खेडा पो. भागुनगर, ता. जहाजपुर जि. भिलवाडा राज्य राजस्थान) हा घेवून रवाना झाला होता, सदर वेळी चालकास अनिलकुमार पुनिया यांनी डिझेल व इतर खर्चा करीता ५० हजार रुपयांचे आय.यु.सी.एल. कार्ड दिले होते. त्यानुसार त्याने सदरचे कार्ड स्वीप करुन अमळनेर शहरातील प्रमुख पेट्रोलपंपावर डिझेल भरले होते व उरलेली रक्कम ही त्याने पोहच केल्यावर दिली जाणार होती.

माल कर्नाटक पोहोचलाच नाही

सदरचा माल ट्रक चालक याने दि. ९ जानेवारी रोजी पावेतो तुमकुर (कर्नाटक) येथे पोहेचविणे अपेक्षीत होते. परंतु सदरचा माल हा ठरल्या वेळेप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी न पोहेचल्याने अनिलकुमार पुनिया यांनी चालक कैलास श्रीराम गुर्जर याच्या तसेच ट्रक मालक पुष्पेद्रसिंग सुदानसिंग चहर याच्या मोबाईलवर आणि नमुद ट्रक हा ज्या ट्रान्सपोर्टवरुन अमळनेर येथील ट्रॉन्सपोर्ट वर आला होता, त्या महाविर ट्रॉन्सपोर्टचे (जयपुर राज्य-राजस्थान) मालक मोहन बेरवा यांच्यामोबाईलवर देखील संपर्क केला. परंतू सर्वांचे मोबाईल बंद येत होते. त्यामुळे तब्बल ३३ लाखांचा लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अमळनेर पोलिसात तक्रार देण्यात आली.

ट्रक मालक- चालकविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी ट्रक क्र. आर. जे. ११ जि.ए.८१३८ चे चालक- कैलास श्रीराम गुर्जर व ट्रक मालक- पुष्पेद्रसिंग सुदानसिंग चहर (रा.मुरली विहार,देवरीठा, शाहगंज, आग्रा राज्य-उत्तरप्रदेश) अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे हे करीत आहेत.

Tags: amalner crime
Previous Post

प्रिया पाटील यांची लक्षवेधी कामगिरी; सायकलने १२ तासात पार केले २०० किमीचे अंतर

Next Post

हप्तेखोरीमुळे वाळू माफिया बेलगाम! व्हायरल क्लिपमुळे महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात

Next Post
जळगाव तालुक्यात वाळूमाफिया मुजोर! अवैध वाळू वाहतुकीबाबत अधिकाऱ्यांची हतबलता की निष्क्रियता

हप्तेखोरीमुळे वाळू माफिया बेलगाम! व्हायरल क्लिपमुळे महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!