• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे खुलले दार, तीन रुग्णांना ४ लाखांची मदत

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 11, 2023
in Uncategorized
0
Spread the love

चाळीसगाव : वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील तीन रुग्णांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकाच आठवड्यात जवळपास ४ लाखांची आर्थिक मदत मिळाली असून त्यांचा पुढील वैद्यकीय उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.

यामध्ये पिंपळगाव ता.चाळीसगाव येथील रहिवासी सदानंद हरिश्चंद्र चव्हाण यांच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी २ लाख रुपये, चाळीसगाव येथील मनोज साहेबराव साळुंखे यांना कॅन्सर वरील उपचारासाठी १ लाख रुपये,  खडकीसीम येथील भगवान वाल्मिक चव्हाण यांच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी १ लाख रुपये असे मंजूर झाले आहेत. तात्काळ सदर मदत मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष यांचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आभार मानले आहेत.

गरजू रुग्णांनी संपर्क साधवा

चाळीसगाव तालुक्यात विविध आजारांसाठी वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे मात्र योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतात. चाळीसगाव येथील अंत्योदय जनसेवा कार्यालयात देखील यासाठी विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला असून गरजू रुग्णांना योग्य ते वैद्यकीय मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत करण्यात येते. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

१. अर्ज ( विहीत नमुन्यात) आमदार कार्यालयात मिळेल
२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.
(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक
५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.
८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी नढउउ / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नावे

१. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष २ ते ६),
२. हृदय प्रत्यारोपण
३. यकृत प्रत्यारोपण
४. किडणी प्रत्यारोपण
६. बोन मॅरो प्रत्यारोपण
५. फुफ्फुस प्रत्यारोपण
७. हाताचे प्रत्यारोपण
८. हिप रिप्लेसमेंट
९. कर्करोग शस्त्रक्रिया
१०. अपघात शस्त्रक्रिया
११. लहान बालकांचे शस्त्रक्रिया
१२. मेंदूचे आजार
१३. हृदयरोग
१४. डायलिसिस
१५. अपघात
१६. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)
१७. नवजात शिशुंचे आजार
१८. गुडघ्याचे प्रत्यारोपण
१९. बर्न रुग्ण
२०. विद्युत अपघात रुग्ण

Tags: #mangesh chvanamalner news
Previous Post

नगरपालिका अधिकारी जोमात जनता कोमात, चाळीसगाव येथे रुग्णसेवेचा बोजवारा

Next Post

शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत तारीख पे तारीख; उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी

Next Post

शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत तारीख पे तारीख; उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!