• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे सरकारला मोठा धोका, पक्षांतर बंदी कायद्यानुसार मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांवर अपात्रेची शक्यता

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 21, 2023
in राजकीय
0
शिंदे- सरकारमध्ये मंत्रिपदासाठी विशेष अट, या माजी मंत्र्याचा पत्ता कट !
Spread the love

मुंबई : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार खडाजंगी होताना पाहायला मिळत आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावरून केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी दोन्ही गटांची बाजू ऐकल्यानंतर आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरू शकतात आणि असे झाले तर हे सरकार कोसळू शकते, असा मोठा दावा घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केला आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गटाला लेखी उत्तरे सादर करण्यासाठी 30 तारखेपर्यंतची मुदत दिली आहे. निवडणूक आयोगासमोरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी यावर भाष्य करताना मोठा दावा केला आहे. तसेच कायदेशीर बाजू समजावून सांगताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असून पूर्णपणे स्वायत्त आहे. राज्यघटनेच्या 15 व्या परिशिष्टानुसार निवडणूक आयोगाला प्रचंड अधिकार दिले आहेत. सदर प्रकरण कलम 324 अंतर्गत दिलेले अधिकार आणि ‘इलेक्शन सिम्बॉल ऑर्डर- 1968’ या कायद्यानुसार सुरू आहे. एका पक्षात दोन गट पडले तर कोणत्या गटाला मान्यता द्यायची? आणि कोणत्या गटाला पक्षचिन्ह द्यायचे? हे निवडणूक आयोग ठरवतो, अशी माहिती उल्हास बापट यांनी दिली.

शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरु शकतात

राज्यघटनेचे दहावे शेड्युल असे सांगते की, दोन तृतीयांश लोक एकाच वेळी पक्षातून बाहेर पडले आणि ते दुसऱ्या पक्षात सामील झाले. तर ते वाचतात, अन्यथा ते अपात्र ठरतात. त्यामुळे सुरुवातीला शिवसेनेतून बाहेर पडलेले 16 आमदार हे दोन तृतीयांश नाहीत. तसेच ते दुसऱ्या कोणत्याही पक्षात सामील झाले नाहीत. त्यामुळे ते आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. संबंधित 16 आमदार अपात्र ठरले तर त्यामध्ये एकनाथ शिंदेही आहेत. तेही अपात्र ठरतील. पक्षांतर बंदी कायद्यानुसार एकनाथ शिंदे अपात्र ठरले. तर त्यांना मंत्री राहता येणार नाही, म्हणजेच त्यांना मुख्यमंत्रीही राहता येणार नाही. याचा अर्थ असा झाला की हे सरकार पडेल. संबंधित सोळा आमदार अपात्र ठरल्यास बाकीचे आमदारही अपात्र ठरतील, असे उल्हास बापट यांनी सांगितले.

Tags: eknath shindeshivsena
Previous Post

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, MPSC ने काढली सर्वात मोठी भरती

Next Post

क्रेडीट कार्डच्या नावाखाली तरुणाची फसवणूक; ऑफर असल्याचे सांगून साडेसात लाखांत गंडवले

Next Post

क्रेडीट कार्डच्या नावाखाली तरुणाची फसवणूक; ऑफर असल्याचे सांगून साडेसात लाखांत गंडवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!