• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय; पोलिसांच्या कारवाईने खळबळ

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 23, 2023
in Uncategorized
0
साकेगावात सुरू होता धक्कादायक प्रकार, बनावट ग्राहक पाठवताच पोलिसही झाले हैराण
Spread the love

जळगाव: भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे महिलेच्या घरातून 22 हजारांच्या बनावट नोटा तालुका पोलिसांनी जप्त केल्या होत्या. ही घटना ताजी असता आता जामनेर तालुक्यातील लाखोली येथील आरोपीच्या घरातून पुन्हा 20 हजारांच्या नोटा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जळगाव येथील एका संगणक दुरूस्ती करणाऱ्या दुकानातून बनावट नोटा तयार करणारे प्रिंटर, स्कॅनर जप्त केले आहे.

साकेगाव येथे गुरूवार, 19 रोजी तब्बल 22 हजारांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या होत्या तर शहनाज अमीन भोईटे (35, पाण्याच्या टाकीजवळ, साकेगाव) व हनीफ अहमद शरीफ देशमुख (लाखोली, नाचणखेडा, ता.जामनेर) यांना अटक करण्यात आली होती. महिलेसह दोन्ही संशयीतांना शुक्रवारी न्यायालयाने 24 जानेवारीपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या चौकशीदरम्यान त्यांनी बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर, स्कॅनर हे खराब झाल्याने ते दुरूस्तीसाठी जळगाव येथे टाकल्याने ते गोलाणी मार्केटमधील एका दुकानातून पंचनामा करून जप्त करण्यात आले आहे.

लाखोलीत आढळल्या बनावट नोटा

जळगाव येथून पथक थेट जामनेर तालुक्यातील नाचणखेड जवळील लाखोलीत धडकले. संशयीत हनीफ देशमुख यांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता पोलिसांना तेथे 20 हजारांच्या बनावट नोटा आढळल्याने त्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणात दोन संशयीतांसोबत अजून कोणी या रॅकेटमध्ये सहभागी आहे वा यापूर्वी कुठे-कुठे नोटा वितरीत केल्या करण्यात आल्या याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार, हवालदार युनूस शेख, योगेश पालवे, रीयाज शेख करीत आहेत.

 

Tags: jalgaon crime
Previous Post

SSC मार्फत निघाली मेगाभरती; दहावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी

Next Post

भाजपामध्ये आमदारकीसाठी स्पर्धा; माजी उपमहापौरांचे पोस्टर झळकले

Next Post
भाजपामध्ये आमदारकीसाठी स्पर्धा; माजी उपमहापौरांचे पोस्टर झळकले

भाजपामध्ये आमदारकीसाठी स्पर्धा; माजी उपमहापौरांचे पोस्टर झळकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!