• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 23, 2023
in जळगाव
0
जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
Spread the love

जळगाव : गावातील अतिक्रमणाबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने त्रस्त झालेल्या भडगाव तालुक्यातील कजगाव येथील तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. भूषण पाटील असे तरुणाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी सांगितले की, भडगाव तालुक्यातील कजगाव येथे शासकीय जमिनीवर अतिक्रमण वाढले आहे. मात्र, काही राजकीय पुढार्‍यांमुळे या अतिक्रमणधारकांवर कारवाई केली जात नसल्याची भूषण पाटील याची तक्रार आहे. अतिक्रमण हटवून तेथे अद्ययावत बसस्थानक होईल एवढीच जागा आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडे पाटील याने वेळोवेळी तक्रारी केल्या. त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झालेे.

पोलिसांनी केली अटक

त्यामुळे त्रस्त झालेला पाटील हा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा प्रकार वेळीच पोलिसांच्या लक्षात आला. त्यामुळे पोलिसांनी पेट्रोल भरलेल्या कॅनसह पाटील याला ताब्यात घेतले. पाटील याला जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

Tags: jalgaon news
Previous Post

राज्यात नवं सत्ता समीकरण! शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा

Next Post

जळगावात बोली भाषेतील पहिल्या वेब सीरिजचे शुटिंग, खानदेशी लेखकांच्या कथांचे चित्रीकरण

Next Post
जळगावात बोली भाषेतील पहिल्या वेब सीरिजचे शुटिंग, खानदेशी लेखकांच्या कथांचे चित्रीकरण

जळगावात बोली भाषेतील पहिल्या वेब सीरिजचे शुटिंग, खानदेशी लेखकांच्या कथांचे चित्रीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!