• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात बोली भाषेतील पहिल्या वेब सीरिजचे शुटिंग, खानदेशी लेखकांच्या कथांचे चित्रीकरण

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 23, 2023
in जळगाव
0
जळगावात बोली भाषेतील पहिल्या वेब सीरिजचे शुटिंग, खानदेशी लेखकांच्या कथांचे चित्रीकरण
Spread the love

जळगाव : शहरात नर्मदास फ्युचर फिल्मतर्फे खानदेशातील लेखकांनी लिहिलेल्या कथांवर आधारित व खान्देशातील कलावंतांना घेऊन ‘माझी बोली माझी वेब सिरीज’ या एपिसोडिक वेब सिरीजचे शुटिंग सुरु झाले आहे.

या वेबसिरीजमध्ये प्रत्येक कथेचे लेखक वेगवेगळे असून कथेतील कलाकारसुद्धा त्या त्या अनुषंगाने बदलणार आहे. या वेबसिरीजचे वैशिष्ट म्हणजे लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि संपूर्ण टेक्निकल टीम ही खान्देशातीलच असून याला जळगाव जिल्ह्यातील कलावंतांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

ही वेबसिरीज पब्लिक फंडिंगच्या माध्यमातून तयार होत असून, वेबसिरीजसाठी एक निर्माता नसून अनेक निर्माते आणि दाते या वेबसिरीजच्या निर्मितीसाठी मदत करत आहेत. या धर्तीवर होणारा हा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम आहे.
या वेबसिरीजचे दिग्दर्शक प्रशांत सोनवणे हे असून, त्यांनी आतापर्यंत माय माऊली मनुदेवी, लढा शिक्षणाचा, आणि ‘एक नंबरचा ढ’ चित्रपट केलेले आहेत. तसेच त्यांच्यासोबत दिग्दर्शक म्हणून किरणकुमार अडकमोल आणि निर्मिती प्रमुख ऋषीकेश भरत धर्माधिकारी हे आहेत.

११ वेब सिरीज करण्याचा मानस

या व्यतिरिक्त कॉश्चूमकरिता पुनम जावरे, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पवन इंद्रेकर, सागर अत्तरदे असून, कॅमेरा तेजस भंगाळे सांभाळत आहेत. या संपूर्ण टीम व प्रोडक्शनतर्फे वर्षभरात ११ वेब सिरीज करण्याचा मानस असून यासाठी जास्तीत जास्त खान्देशवासियांनी निर्मिती सहाय्य, कलावंत आणि लेखकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Tags: jalgaonwebserise
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Next Post

या बँकेत निघाली बंपर भरती! पगारही मिळणार बक्कळ, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण माहिती

Next Post
बँकेत नोकरीची संधी ; 700हून अधिक रिक्त जागांसाठी भरती सुरू..

या बँकेत निघाली बंपर भरती! पगारही मिळणार बक्कळ, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!