• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंदाकिनी खडसे यांना मोठा दिलासा, सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 25, 2023
in जळगाव
0
मंदाकिनी खडसे यांना मोठा दिलासा, सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Spread the love

जळगाव : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करीत मोठा दिलासा दिला. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात उच्च न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देताना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्यास सांगितले होते. त्यानुसार मंदाकिनी यांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम 88 अन्वये सत्र न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्यावतीने ऍड. मोहन टेकावडे यांनी बाजू मांडली.

जामीन अर्जाला विरोध

मंदाकिनी खडसे यांनी ईडीच्या तपासादरम्यान संपूर्ण सहकार्य केले आहे. त्यांनी जवळपास 15 वेळा ईडीच्या कार्यालयात हजेरी लावून आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केलेली आहेत, असे ऍड. टेकावडे यांनी सांगितले. त्यावर ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी मंदाकिनी खडसे यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मंदाकिनी यांचा नियमित जामिनाचा अर्ज निकाली काढला जाईपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला.

न्यायालयाने घातल्या अटी

या कालावधीत मंदाकिनी यांनी पुराव्यांमध्ये कुठलीही छेडछाड करू नये, देश सोडून बाहेर जाऊ नये तसेच ईडीचे तपास अधिकारी बोलावतील त्यावेळी यंत्रणेच्या अधिकाऱयांपुढे हजर राहावे, अशा अटी न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करताना घातल्या आहेत.

Tags: Eknath khEknath kharademandakini khadse
Previous Post

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर, शिवसेना ठाकरे गटाचा उपक्रम

Next Post

मुक्ताईनगर तालुक्यात मोठा अपघात, बसमधील १० प्रवासी जखमी

Next Post

मुक्ताईनगर तालुक्यात मोठा अपघात, बसमधील १० प्रवासी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!