जळगाव: नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक चार दिवसांवर येऊन ठेपली असतांनाही काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांनी भाजपकडे मागितलेल्या
पाठिंबा बाबत अजूनही संस्पेन्स कायम आहे. जळगाव येथ तांबे यांना पत्रकारांनी भाजप पाठिंबा बाबत विचारलेल्या प्रश्नांना बगल दिली. कोणतंही राजकीय वक्तव्य आपण करणार नाही असा पवित्रा सत्यजित तांबे यांनी घेतला आहे. तांबे यांना काँग्रेसने पक्षातून निलंबित केलं असलं तरी आता तांबे यांना भाजपबरोबर काँग्रेस शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही मत हवी असल्याने सत्यजित तांबे हे राजकीय वक्तव्यापासून अलिप्त राहणं सोयीचं मानंत आहे.
सगळ्या लोकांचा मला पाठिंबा
जळगाव येथील प्रचार मेळाव्यात सत्यजित तांबे यांनी आपली भूमिका मांडली. ‘मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी काँग्रेसचा फॉर्म भरला होता, पण तांत्रिक कारणाने मला एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून माझा फॉर्म अपक्ष झाला’ असा खुलासा तांबे यांनी केला आहे. सगळ्या लोकांचा मला पाठिंबा असून सगळे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असून मी काँग्रेसचा फॉर्म भरला होता पण तांत्रिक कारणाने मला एबी फॉर्म मिळाला नसल्याने माझा फॉर्म अपक्ष भरावा लागला, असं सत्यजित तांबे म्हणाले.
नाना पटोले यांच्या टीकेबाबत बोलणं टाळलं
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या टीकेवर ‘वेळ येईल तेव्हा बोलेल’ असं म्हणत सत्यजित तांबे यांनी बोलणं टाळलं. तसंच, डॉ. सुधीर तांबे यांचे जळगाव जिल्ह्यातील लोकांची अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असून त्यामुळे सर्वकाही विसरून जळगाव जिल्ह्यातील मतदार आमच्या पाठीशी असल्याचा विश्वास सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला आहे.