• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ॲड. प्रवीण चव्हाण खंडणी प्रकरणाचा तपास एसआयटीकडे, पाच सदस्यीय पथक करणार चौकशी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 2, 2023
in क्राईम, जळगाव
0
ॲड. प्रवीण चव्हाण खंडणी प्रकरणाचा तपास एसआयटीकडे, पाच सदस्यीय पथक करणार चौकशी
Spread the love

जळगाव : जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सोसायटी गैरव्यवहार प्रकरणातील तत्कालीन सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पाच जणांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येणार आहे.

एक कोटी २० लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार सूरज सुनील झंवर (रा. जळगाव) यांनी डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार सुरुवातीला डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात ॲड. प्रवीण पंडित चव्हाण (रा. शिवाजीनगर, पुणे), शेखर मधुकर सोनाळकर (रा. जळगाव), उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव) हे आरोपी आहेत.

चाळीसगाव येथे गुन्हा वर्ग

खंडणीची रक्कम चाळीसगाव येथे देण्यात आल्याने हा गुन्हा पुण्यातून जळगाव पोलिसांकडे वर्ग झाला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेमार्फत करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या पथकात पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, प्रत्येकी दोन हवालदार व नाईकांचा समावेश आहे.

सुनील झंवर यांचा जबाब
या पथकाने गेल्या आठवड्यात फिर्यादीचे वडील सुनील झंवर यांना एक पत्र दिले. जबाब नोंदविण्याकामी हजर राहण्याविषयी पत्राद्वारे कळविण्यात आले. त्यानुसार दि. १ फेब्रुवारी रोजी झंवर यांचा जबाब एसआयटी पथकाने नोंदविला आहे. तसेच झंवर यांच्याकडून काही पुराव्यांसह दस्तऐवजही एसआयटीने ताब्यात घेतले आहेत.

१ कोटी २० लाखांची खंडणी मागितली

बीएचआरच्या संचालकांविरोधात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. डेक्कन पोलिस ठाण्यात सुनील झंवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात जामीन मंजूर करून देणे तसेच गोठविलेली बँक खाती पुन्हा सुरू करण्यासाठी ॲड. चव्हाण यांनी मध्यस्थ उदय पवार, शेखर सोनाळकर यांच्यामार्फत १ कोटी २० लाख रुपयांची खंडणी मागितली, असे झंवर यांनी फिर्यादीत म्हटले होते.

Tags: Sit
Previous Post

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये निघाली भरती, जाणून घ्या आवश्यक पात्रता

Next Post

मोठी बातमी! पंढरपूरात भाविकांना विषबाधा, 137 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

Next Post
मोठी बातमी! पंढरपूरात भाविकांना विषबाधा, 137 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

मोठी बातमी! पंढरपूरात भाविकांना विषबाधा, 137 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!