• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर तालुका हादरला! घरात महिला एकटी असल्याचे पाहून केली निर्घृण हत्या

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 8, 2023
in क्राईम
0
जामनेर तालुका हादरला! घरात महिला एकटी असल्याचे पाहून केली निर्घृण हत्या
Spread the love

जामनेर : घरात एकटे असल्याची संधी साधून एका तरुणाने महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मात्र महिलेनं प्रतिकार करताच लोखंडी वस्तूने डोक्यात वार करुन महिलेची हत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे घडली. संशयित आरोपीचे विशाल ज्ञानेश्वर साबळे (वय २३) असे नाव आहे.

जामनेर तालुक्यातील चिंचखेडा गावात महिलेला एकटी पाहून वाईट हेतूने तो घरात घुसला. मात्र हेतू साध्य न झाल्याने त्याने महिलेच्या डोक्यात लोखंडी अवजाराने वार करून निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे. जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या पोलीस पथकाने अवघ्या चोवीस तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव

मयत महिलेचा चुलत सासरा बकऱ्या चारून घरी परतला. दरवाज्याला कडी पाहून सुनबाई कुठे बाहेर गेली असावी म्हणून सासऱ्याने दरवाज्याची कडी उघडून घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच त्यांना सुनबाई किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेली आढळून आली. घटनेची माहिती मिळताच जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक लॅब पथक, एलसीबी पथक, फिंगरप्रिंट्स पथक, श्वान पथक अशा विविध क्राईम डिपार्टमेंटच्या तपास यंत्रणेला पाचारण करण्यात आले.

आरोपीस केली अटक

मयत महिलेचा पती सुरेश पाटील हा जामनेर येथे चहाची हॉटेल लावून व्यवसाय करतो. त्यामुळे तो सकाळीच घरून व्यवसायासाठी गेला होता. मयत महिलेचा मुलगा शाळेत तर सासूही बाहेरगावी गेलेली होती. या संधीचा फायदा घेऊन गावातील गुन्हेगारी वृत्तीचा तरुण विशाल नाना साबळे (वय २३) याने वाईट हेतूने हे कृत्य केले आहे. पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस निरीक्षक किसन पाटील यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने गुप्त यंत्रणेच्या सहाय्याने या गुन्ह्याचा तपास लावला. फरार झालेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली.

Tags: crime news
Previous Post

जळगावात भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले

Next Post

संतापजनक! शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चोरी, रोहित पवारांनी केली चौकशीची मागणी

Next Post
संतापजनक! शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चोरी, रोहित पवारांनी केली चौकशीची मागणी

संतापजनक! शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चोरी, रोहित पवारांनी केली चौकशीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!