• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोपडा येथे कापड दुकानाला भीषण आग, तरुणाचा जळून मृत्यू

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 11, 2023
in Uncategorized
0
चोपडा येथे कापड दुकानाला भीषण आग, तरुणाचा जळून मृत्यू
Spread the love

जळगाव – जिल्ह्यातील चोपडा शहरात मुख्य बाजारपेठेतील राहुल एम्पोरिअम या तीन मजली कापड दुकानास गुरुवारी रात्री तीन वाजेच्या दरम्यान आग लागली.आगीत गौरव राखेचा (वय २७) या तरुणाचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

चोपडा येथील मेनरोड वरील इमारतीत तळ मजल्यावर कापड दुकान, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर रहिवास असणाऱ्या राहुल एम्पोरिएम या तीन मजली इमारतीस मध्यरात्री अचानक आग लागली. आग इतकी भयंकर होती की, आगीने काही क्षणांत रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाला दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरून खिडकीच्या बाहेर येत होते. आगीची माहिती मिळताच पोलीस, नगर पालिका प्रशासन यांनी बचावकार्य सुरू केले. आग विझवण्यासाठी चोपडा, अमळनेर, धरणगाव, यावल, शिरपूर, जळगांव येथील अग्निशमन दलाची वाहने दाखल झाली होती.

बाथरूममध्ये जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळला

नगर पालिकेचे फायर विभागाचे कर्मचारी व शहरातील तरुण यांनी आग विझवण्यासाठी अथक परिश्रम केले. यात घरात अडकलेल्या पाच वर्षीय चिमुकलीसह सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र गौरव हा जीव वाचवण्यासाठी इतरत्र जागा शोधण्याच्या नादात बेडरूम मधून बाथरूम मध्ये थांबला. तिथेच त्याचा घात झाला. सकाळी सहा वाजता बाथरूममध्ये जळालेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला.

लाखो रुपयांचे नुकसान….

आग इतकी तीव्र होती की घरातील पीओपी,घरातील, जिन्यातील फरशा, किचन ओटा, भांडी जळून कोळसा झाले आहेत. सोफ्याच्या ड्रावरमध्ये ठेवलेली नोटांची बंडल जळाली. तीनच्या सुमारास लागलेल्या आगीवर पहाटे सहा वाजता नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र गौरव याला वाचवण्यात अपयश आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे,आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Previous Post

एलसीबीची मोठी कारवाई! भुसावळात गांजा तस्करीचा पर्दाफाश, ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

यावल येथे भरधाव ट्रक उलटला : चालकासह क्लिनर, जखमी

Next Post
यावल येथे भरधाव ट्रक उलटला : चालकासह क्लिनर, जखमी

यावल येथे भरधाव ट्रक उलटला : चालकासह क्लिनर, जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!