जळगाव: जळगाव येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत एका मोटर अपघात प्रकरणी इन्शुरन्स कंपनी यांनी 2 कोटी 25 लाखाचे नुकसान भरपाई अर्जदारांना देण्याकमी कोर्टात जमा केली. महत्त्वाची बाब म्हणजे सदरची नुकसान भरपाईची रक्कम ही आजपर्यंत लोकन्यायालय मार्फत मोटार अपघात प्रकरणी अदा केलेली सर्वात मोठी रक्कम आहे.
एरंडोल येथील व्यक्तीच्या मुलाचा मोटर अपघातात पुणे येथे दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे जळगाव येथील मोटर अपघात दावा प्राधिकरणात वाहनमालक व चालक यांची इन्शुरन्स कंपनीवर नुकसान भरपाईसाठी ॲड. महेंद्र सोमा चौधरी यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. सदरचा दावा जानेवारी 2022 रोजी दाखल करण्यात आला. गाडी मालक, चालक व इन्शुरन्स कंपनी यांना कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स काढण्यात आले.
वर्षभरात मिळाला न्याय
अर्जदारांचे वकिलांनी कोर्टात प्रकरण दाखल करताना भरभक्कम पुरावे दिले होते. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीने सदरचे प्रकरण मागितलेल्या नुकसान भरपाई प्रमाणे अर्जदारांना लवकरात लवकर देण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून त्यांचे व्याज व कोर्टाचा खर्च वाचेल. प्रकरण दाखल केल्यापासून केवळ एक वर्षाच्या आत अर्जदारांना नुकसान भरपाईपोटी न्याय मिळाल्याचे समाधान झाले.
चर्चेअंती नुकसान भरपाई अदा
लोकअदालच्या माध्यमातून सदरचे प्रकरण हे अर्जदारांच्या व त्यांच्या वकिलांच्या संमतीने सामंजस्याने मिळत असलेली नुकसान भरपाई रक्कम ही समाधानकारक वाटल्यावर चर्चेअंती दोन कोटी 25 लाख रुपये विमा कंपनीने या प्रकरणात कोर्टात दाखल केले.
अर्जदारातर्फे ॲड महेंद्र सोमा चौधरी यांनी काम पाहिले. तसेच विमा कंपनीतर्फे विमा कंपनीचे अधिकारी विक्रांत व्यास व विमा कंपनीच्या वकील ॲड. जयंत फडके यांनी घेतलेल्या सामुदायिक प्रयत्नांना अर्जदारांना न्याय मिळाल्याचे समाधान झाले.
यांचे लाभले सहकार्य
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अध्यक्ष एमक्यूएसएम शेख, पॅनल अध्यक्ष बी. एस. वावरे, पॅनल सदस्य प्रतिभा पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ए. ए. के. शेख, वरिष्ठ लिपिक अविनाश कुलकर्णी, प्रमोद पाटील, प्रमोद ठाकरे, गणेश निंबाळकर, चंद्रवदन भारंबे, प्रकाश काजळे आदींचे सहकार्य लाभले
.