जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने फत्तेपूर येथील ज्वेलर्स दुकानात झालेल्या चोरीचा उलगडा केला असून कुविख्यात दरोडेखोरांना अटक केली आहे. आरोपींनी तीन घरफोड्यांची कबुली दिली असून आणखी काही चोर्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. गजानन सोपान शिंगाडे (32, पाचन वडगाव, ता.जालना), करतारसिंग गुरुमुखसिंग जुनी (19, सरकारी दवाखान्यामागे, धरणगाव) व बलदेवसिंग बापूसिंग जुनी (22, सरकारी दवाखान्या मागे, धरणगाव) अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत.
कुविख्यात गजानन शिंगाडे याने आपल्या साथीदारांसह फत्तेपूर येथे ज्वेलरी शॉपमधून 45 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने, बेन्टेक्सचे दागिने तसेच पहूरसह धरणगाव पोलिस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार विजयसिंग धनसिंग पाटील, संदीप रमेश पाटील, अशरफ शेख निजामोद्दीन, सुधाकर रामदास अंभोरे, सुनीत पंडीत दामोदरे, प्रवीण जनार्दन मांडोळे, रवींद्र रमेश पाटील, अविनाश बापुराव देवरे, दीपककुमार फुलचंद शिंदे, प्रमोद शिवाजी ठाकुर तसेच धरणगाव पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक मिलिंद अशोक सोनार, वैभव गोकुळ बाविस्कर आदींच्या पथकाने केली. आरोपींना तपासार्थ पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.