मुंबई : तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुम्हाला चांगला परतावा देऊ शकते. परंतु तुम्हाला 31 मार्चपूर्वी या योजनेत गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत तुम्ही फक्त एकदाच गुंतवणूक करून दरमहा 18,500 रुपये मासिक पेन्शन मिळवू शकता. ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवण्यात आली आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री वय वंदना योजना आहे आणि ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) 4 मे 2017 रोजी सुरू केली. ही योजना आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये बंद होणार आहे आणि गुंतवणूकदारांना दरमहा 18,500 रुपये पेन्शन मिळू शकते.
जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर या योजनेसाठी गुंतवणूकीची कमाल मर्यादा रु. 15 लाख आहे आणि गुंतवणूकदार एकूण 10 वर्षांसाठी यामध्ये गुंतवणूक करू शकतात. गुंतवलेली रक्कम सुरक्षित आहे आणि LIC मुदतपूर्तीनंतर मूळ रक्कम परत करेल. या योजनेत पॉलिसी लवकर बंद करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. गुंतवलेल्या रकमेनुसार पेन्शन सुविधा उपलब्ध आहे आणि गुंतवणूकदार त्यांच्या गरजेनुसार पेन्शन काढण्याचा पर्याय निवडू शकतात.
सेवानिव़ृत्तीनंतरची चिंता मिटणार
सेवानिवृत्तीचे वय जवळ येताच आणि सेवानिवृत्तीनंतर, आर्थिक स्थिरता आणि देखभालीची चिंता वाढते. उत्पन्नाचा स्रोत संपला तरी खर्च कायम राहतो किंवा वाढतो. ही चिंता दूर करण्यासाठी सरकार ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी विविध पेन्शन योजना सुरू करत आहे. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री वय वंदना योजना, जी केवळ 31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे.
वैद्यकीय चाचणीची गरज नाही
ही योजना गुंतवणूकदारांना मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर पेन्शन प्राप्त करण्यास अनुमती देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय चाचणी घेण्याची गरज नाही. जर गुंतवणूकदार कोणत्याही गंभीर आजाराने त्रस्त असेल तर तो मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढू शकतो. पॉलिसी खरेदी केल्यानंतर तीन वर्षांनी ते पैसे काढू शकतात किंवा पॉलिसीवर कर्ज घेऊ शकतात. योजनेच्या मुदतपूर्तीपूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, गुंतवलेली रक्कम नॉमिनीला दिली जाईल.
पती-पत्नी दोघेही गुंतवणूक करू शकतात
या योजनेची एक खास गोष्ट म्हणजे पती-पत्नी दोघेही यामध्ये गुंतवणूक करू शकतात. एकत्रितपणे, ते 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात आणि त्यांना 15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसाठी दरमहा 9,250 रुपये पेन्शन मिळेल. जर पती-पत्नी दोघांनी या योजनेत गुंतवणूक केली तर त्यांना दरमहा 18,500 रुपये पेन्शन मिळेल. या योजनेसाठी अर्ज अधिकृत वेबसाइट किंवा LIC च्या कोणत्याही शाखेला भेट देऊन सबमिट केला जाऊ शकतो. यामध्ये फक्त 60 वर्षांवरील लोकच गुंतवणूक करू शकतात.