जळगाव: तालुक्यातील भोकर या ठिकाणी विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांचे लोकार्पण केले. तसेच या कार्यक्रमात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
भोकर येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात व जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्या माध्यमातून धरणगाव शहराचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संभाजी कंखरे, काँग्रेसचे तालुका सरचिटणीस दिपक जाधव, पाष्टाण्याचे माजी सरपंच किशोर निकम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आज शिंदे गटात दाखल झाले आहे.
यामुळे जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याला सुरुवात झाली आहे.