मुंबई: मध्यमवर्गीय लोक पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजनांना सर्वात सुरक्षित बचत योजना मानतात. आता पोस्ट ऑफिसमध्येच अशी योजना मिळेल, जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील आणि तुम्हाला दर महिन्याला चांगले उत्पन्न मिळेल. 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीत, पोस्ट ऑफिसची ही योजना सामान्य लोकांना 3 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न देते.
जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा सेवानिवृत्त झाला असाल. तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, कारण या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मासिक उत्पन्न पेन्शन म्हणून वापरू शकता.
योजनेबद्दल जाणून घ्या
पोस्ट ऑफिसमध्ये उघडल्या जाणाऱ्या National Monthly Income Scheme बद्दल याठिकाणी माहिती देणार आहोत. यामध्ये किमान रु. 1,000 गुंतवता येत असले, तरी चांगली रक्कम जमा करून सर्वोत्तम फायदा मिळतो. MIS खात्यात एकदा पैसे जमा करावे लागतील. त्यानंतर दरमहा व्याज दिले जाते. जानेवारी-मार्च तिमाहीसाठी, सरकार या खात्यावर 7.1 टक्के वार्षिक व्याज देईल. मात्र, यामध्ये वेळोवेळी बदल होत राहतील.
3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल
– सध्या, MIS अंतर्गत, एका खात्यात जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 9 लाख रुपयांची मर्यादा आहे. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 च्या अर्थसंकल्पातील भाषणात ही मर्यादा अनुक्रमे 9 लाख आणि 15 लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे.
– या योजनेत तुम्ही एकाच वेळी 9 लाख रुपये गुंतवले आहेत असे समजू या. त्यामुळे सध्याच्या व्याजदरानुसार तुमचे दरवर्षी 63,900 रुपये उत्पन्न असेल. म्हणजे दरमहा रु 5,000 पेक्षा जास्त, या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे, तर एकूण तुमचे अतिरिक्त उत्पन्न रु. 3,19,500 होईल.
– या योजनेत, तुम्हाला 1 वर्ष आणि 3 वर्षात बाहेर येण्याची सुविधा देखील मिळते. त्याच वेळी, पालक देखील त्यांच्या मुलांसाठी या खात्यात गुंतवणूक करू शकतात, तर 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचे खाते त्यांच्या स्वतःच्या नावावर उघडले जाते.