जळगाव – हत्येच्या प्रयत्नात असलेला तरुण हा जळगाव कोर्टातून पसार झाला. त्याने पळून जाण्याकरीता जळगाव रेल्वे स्थानकातून मंगला एक्सप्रेस पकडली. गाडी कल्याण रेल्वे स्थानकात येताच पोलिस तपासणीत तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. अटक आरोपीचे नाव सुरेश हिंदाते असून त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल आणि चार काडतूस जप्त केले आहेत.
दोन वर्षापूर्वी एका हत्येच्या प्रकरणात धम्मप्रिय सुरडकर हा तरुण जेलमधून सुटून आला होता. धम्मप्रियने ज्या तरुणाची हत्या केली होती. त्या तरुणाच्या साथीदाराने धम्मप्रियची गोळ्य़ा घालून हत्या केली. ही हत्या धम्मप्रियच्या बापासमोरच करण्यात आली होती. मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला मारण्यासाठी धम्मप्रियचा बाप मनोहर सूरडकर हा जळगाव कोर्टात पोहचला होता. त्याठिकाणी हत्येचा प्रयत्न होणार आहे, याचा सुगावा पोलिसांना आधीच लागला होता. पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नात असलेल्या मनोहरला पकडले. मात्र, मनोहरचा साथीदार सुरेश हिंदाते हा त्याठिकाणाहून पसार झाला. त्याने जळगाव रेल्वे स्थानकात आलेली मंगला एक्सप्रेस पकडली. त्याचा कल्याणच्या दिशेने प्रवास सुरु झाला.
बॅगेत सापडला गावठी कट्टा
कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे आरपीएफचे अधिकारी प्रवाशांच्या बॅगा तपासत होते. याचवेळी मंगला एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आली. या गाडीच्या एका बोगीची तपासणी सुरु असताना बोगीतून सुरेश् हिंदाते हा प्रवास करीत होता. त्याच्या बॅगेत गावठी पिस्तूल आढळून आली. आरपीएफचे अधिकारी अनिल उपाध्याय यांनी सुरेशला ताब्यात घेत. त्याच्याकडून पिस्तूल आणि चार काडतूसे जप्त केली.
जळगाव कोर्टातून झाला होता फरार
सुरेशला कल्याण रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. तो जळगावचा राहणारा आहे. सुरेश हा मनोहरच्या सोबत जळगाव कोर्टात धम्मप्रियची हत्या करणाऱ्यांची हत्या करण्यासाठी मनोहरच्या सोबत गेला होता. मनोहरला पोलिसांनी पकडले होते. सुरेश त्याठिकाणाहून पसार झाला. मात्र, तो कल्याण रेल्वे स्थानकात पोलिसांच्या जाळ्य़ात सापडला. पोलिसांनी सुरेशला अटक केली असली तरी सुरेश याने पोलिसांना सांगितेल की, तो या प्रकरणातील आरोपी नसून तो एका सराफाकडे कामाला आहे.