मुंबई: सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्कर पुन्हा एकदा अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची भरती करणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रासह देशभरात सैन्य भरती होणार आहे. या संदर्भात लष्कराच्या joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर नवीन भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 16 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झाली आहे.
अग्निवीर जनरल ड्युटी, टेक्निकल, लिपिक/स्टोअर कीपर, ट्रेडसमन या पदांवर ही भरती केली जाईल. तुमची निवड तुम्ही सबमिट केलेल्या अर्जाची शॉर्टलिस्टिंग, ऑनलाइन CCE परीक्षा आणि शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल.
अग्निवीर पात्रता काय आहे?
8वी, 10वी आणि 12वी उत्तीर्ण.. सर्व उमेदवारांसाठी जागा रिक्त आहे. शैक्षणिक पात्रतेपासून ते अग्निवीर वयोमर्यादेपर्यंतचे तपशील पहा-
अग्निवीर ट्रेड्समन: प्रत्येक विषयात 33% गुणांसह 7 इयत्ता 8 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय सर्व विषयांत 33 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण झालेलेही अर्ज करू शकतात.
अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर : कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील 12वी उत्तीर्ण सरासरी किमान 60% गुणांसह. इंग्रजी आणि गणित/अकाउंट्समध्ये किमान 50% गुण आवश्यक आहेत.
अग्निवीर टेक्निकल: विज्ञान (PCM) सह 12वी उत्तीर्ण. किंवा 10वी नंतर ITI किंवा दोन किंवा तीन वर्षांचा कोणताही तांत्रिक डिप्लोमा कोर्स केलेला आहे.
अग्निवीर जनरल ड्युटी- सरासरी 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण. प्रत्येक विषयात 33% गुण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा काय आहे?
अग्निपथ योजनेद्वारे सैन्यात भरती होण्यासाठी उमेदवारांचे वय किमान 17 वर्षे 6 महिने आणि कमाल 21 वर्षे असावे. या वेळी वयोमर्यादेची कटऑफ तारीख 1 ऑक्टोबर 2002 ते 1 एप्रिल 2006 आहे.