जळगाव : जामिनावरील संशयीताला कोरोना काळात जामिनावर सोडण्यात आल्यानंतर त्यास ताब्यात घेवून न्यायालयात आणल्यानंतर संशयीताने लघूशंकेचा बहाण करीत पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळ काढल्याची घटना सोमवारी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास घडली होती. त्यास पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात अरुण भगवान गवळी (वय 22, रा.गुम्मी, ता.जि.बुलढाणा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाअंती संशयीताच्या गुम्मी गावातून मंगळवारी सकाळी मुसक्या आवळल्या आहेत. संशयीताला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
लघवीच्या बहाण्याने पळाला
पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल असून त्यात अरुण भगवान गवळी (रा.गुम्मी, ता.जि.बुलढाणा) हा संशयित असल्याने सोमवारी त्याला ताब्यात घेत पोलीस जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते मात्र पोलिसांची नजर चुकवून संशयीताने पळ काढला. जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश महाजन, नाईक नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, चालक भरत पाटील आदींनी संशयीताच्या मंगळवारी मुसक्या आवळत त्यास शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.