पाचोरा : शहरातील व्यवसायाने आचारी असलेल्या 35 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.किरण रघुनाथ महाजन (वय 35, गजानन नगर, मोंढाळे रोड, पाचोरा) असे मयताचे नाव आहे.
पाचोरा शहरातील रेल्वे स्थानकानजीक असलेल्या हॉटेल चंद्रलोकमध्ये प्रसिद्ध आचारी म्हणून काम करणारे किरण रघुनाथ महाजन (वय 35, पाचोरा) हे सोमवार, 20 फेब्रुवारी रोजी आपले दैनंदिन काम आटोपून दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास आपल्या गजानन नगर भागातील घरी आल्यानंतर त्यांनी खोलीचा दरवाजा लावून गळफास घेतला तर काही वेळानंतर त्यांच्या वहिनी यांनी किरण यांना जेवण करण्यासाठी बोलावण्यास गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
डॉक्टरांनी मयत घोषित केले
शेजार्यांच्या मदतीने किरण महाजन यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी किरण महाजन यांना मृत घोषित केले. मयत किरण महाजन यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, भाऊ, दोन बहिणी असा परीवार आहे.