जळगांव : एकता मराठा फाउंडेशन तर्फे 22 व 26 फेब्रुवारी दरम्यान मराठा क्रिकेट लिग राष्ट्रीय स्तरावर मॅचेसचे आयोजन करण्यात आले आहे. आज 22 फेब्रुवारी रोजी उद्दघाटन सोहळा शिवतीर्थ मैदान सायंकाळी 7 वाजता आयोजित केला आहे.
या उद्दघाटन सोहळ्याला मराठा समाजातील मान्यवर अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, माध्यमिक शिक्षणधिकारी डॉ नितीन बच्छाव, प्रथमिक शिक्षण धिकारी विकास पाटील, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी नगरसेवक आबा कापसे, जे.डी. सी.बँक कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, जळगांव जिल्हा एकता फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद सोनवणे, कार्याध्यक्ष प्रा.गोपाळ दर्जी सर, सचिव सागर पाटील, उपाध्यक्ष निलेश पाटील, सदस्य आबासाहेब पाटील, दिपक भोर्डे, सुनील सोनवणे, व आयोजन समितीचे सर्व सदस्य, खेळाडू, समाजातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.