जळगाव : शेताकडे दुचाकीवरून निघालेल्या विटनेरच्या शेतकर्याचा भरधाव आयशरने धडक दिल्याने मृत्यू झाला. हा अपघात दुपारी दोन वाजता घडला. आयशर चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सोपान विठ्ठल साबळे (वय 44, विटनेर, ता.जि.जळगाव) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
सोपान साबळे हे शेती करून कुटुंबाची उपजिवीका भागवत होते. बुधवार, 22 फेब्रुवारी रोजी ते शेतात दुचाकीने गेले असता दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतातून जळके गावात कामानिमित्त दुचाकीने निघाल्यानंतर जळके ते विटनेर रस्त्यावरील ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेताजवळ भरधाव वेगाने येणार्या आयशरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सोपान साबळे यांचा मृत्यू झाला.
ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल
नागरीकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह हलवल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. एमआयडीसी पोलिसात अज्ञात आयशर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे. मयत शेतकर्याच्या पश्चात पत्नी वंदना, मुलगा किरण, अश्विनी व सोनाली अशा दोन मुली आहेत.