जळगाव : शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्याकडून शिवसेना जिल्हाप्रमुख आपल्या भेटीला उपक्रम राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत जळगाव ग्रामीण मतदारसंघात जिल्हा परिषद गटनिहाय भेट देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज जिल्हा परिषद गटनिहाय म्हसावद- बोरणार गटात शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिकांची भेट घेतली.
जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या अडीअडचणी तसेच विकास कामासंबंधी माहिती जाणून घेतली. आगामी काळात आमचे नेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांची सुरू राहण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यादरम्यान पुन्हा एकदा संघटना उभारणीसाठी कार्यकर्त्यांचा अधिक उत्साह बघायला मिळाला आहे. निलेश पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शिवसेना उभारणीसाठी युद्ध पातळीवर बांधणी केली जात आहे. यासाठी तळागाळातील सामान्य नागरिकांसाठी काम करणाऱ्या शिवसैनिकांची देखील चाचपणी शिवसेनेकडून केली जात आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सोनवणे, बाजार समितीचे संचालक अनिल भोळे, शिवसेना पदाधिकारी रवी कापडने, पी.के. पाटील, रमेश अप्पा पाटील, संदीप सुरळकर, धनंजय पाटील, नियोजन समितीचे माजी सदस्य शिवराज पाटील, सावखेडा खुर्दचे सरपंच जितेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.