नवी दिल्ली : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांचा झाला आहे. होळीपूर्वी हा मोठा धक्का मानला जात आहे.
न्यूज एजन्सी एएनआयनुसार, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आता 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2119.50 रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांचा झाला आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
देशातील प्रमुख शहरातील घरगुती सिलिंडरच्या किमती
– दिल्लीत 1053 रुपयांना मिळणारे सिलेंडर आता 1103 रुपयांना मिळेल.
– मुंबईत 1052.50 रुपयांना मिळणारे सिलेंडर आता 1102.5 रुपयांना मिळेल.
– कोलकाता 1079 रुपयांना मिळणारे सिलेंडर आता 1129 रुपयांना मिळेल.
– चेन्नईत 1068.50 रुपयांना मिळणारे सिलेंडर आता 1118.5 रुपयांना मिळेल.
व्यावसायिक सिलिंडरच्या किमती
– दिल्लीत 1769 रुपयांना मिळणारे सिलेंडर 2119.5 रुपयांना मिळेल.
– मुंबईत 1721 रुपयांना मिळणारे सिलेंडर 2071.5 रुपयांना मिळेल.
– कोलकाता 1870 रुपयांना मिळणारे सिलेंडर 2221.5 रुपयांना मिळेल.
चेन्नई 1917 रुपयांना मिळणारे सिलेंडर 2268 रुपयांना मिळेल.