अमळनेर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्वाक्षरी मोहीमेद्वारे ‘माझी भाषा मायबोली मराठी स्वाक्षरी’ कार्यक्रमाद्वारे मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला.
.ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्त साधून
मनसेतर्फे स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे), शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, शहराध्यक्ष सुनील पाटील, शहर उपाध्यक्ष करण पाटील, शहर सचिव निलेश भावसार, सोनू पाटील, वार्ड अध्यक्ष संभाजी पाटील, शहर संघटक भास्कर ठाकरे, वार्ड अध्यक्ष रोहित सरोदे व मनसे सैनिक उपस्थित होते.