अमळनेर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला झाला. या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमळनेर यांच्याकडून पोलीस निरीक्षक अमळनेर यांना निवेदन देण्यात आले.
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर सकाळी मॉर्निंग आपला शिवाजी पार्क येथे जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. सदरील घटनेची सीबीआय चौकशी करून आरोपीस तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे), शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, शहराध्यक्ष सुनील पाटील (रस्ते आस्थापना), उपशहर अध्यक्ष करण पाटील, शहर सचिव निलेश भावसार, वॉर्ड अध्यक्ष सोनू पाटील, विकी भगत, संदीप पाटील व मनसे सैनिक उपस्थित होते.