नवी दिल्ली : जर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अलीकडच्या काळात, फसवणूक करणाऱ्यांनी लोकांना गंडवून त्यांच्या बँक खात्यांमधून पैसे काढण्याचा नवीन मार्ग शोधला आहे. फसवणुकीच्या या नवीन प्रकारात अडकून अनेकांचे पैसे बुडाले आहेत. त्यामुळे एसबीआयने यासाठी अलर्ट जारी केला असून, लोकांना अशा प्रकारची फसवणूक टाळण्याचा सल्ला दिला आहे.
घोटाळेबाजांचा एक गट लोकांना एका प्रकारच्या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी संदेश देत आहे आणि या सर्वेक्षणात ते जिंकल्यास त्यांना गिफ्टकार्ड किंवा रोख बक्षीस देण्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत लोक सर्वेक्षणाच्या नावाखाली त्यांची महत्त्वाची माहिती त्यांना देत आहेत आणि नंतर फसवणुकीला बळी पडत आहेत.
एसबीआयने दिली सूचना
एसबीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आहे की, असे मेसेज किंवा सर्वेक्षण टाळावेत जे तुमच्या वैयक्तिक तपशीलांची माहिती विचारतील. यासोबतच फसवणुकीची माहिती देण्यासाठी सायबर क्राईमला सूचना देण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
SBI ची PayNow सोबत भागीदारी
SBI ने सिंगापूरची कंपनी PayNow सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे क्रॉस बॉर्डर पेमेंटसाठी ऑनलाइन पेमेंट सिस्टम सुलभ होते. SBI चे BHIM, SBIPAY मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे भारतातून सिंगापूरला निधी हस्तांतरण आणि सिंगापूरहून भारतात निधी हस्तांतरणास अनुमती देईल. दोन्ही देशांच्या बँका आणि वित्तीय संस्थांचे सर्व खातेदार या प्रणालीचा लाभ घेऊ शकतात. या करारामुळे दोन्ही देशांदरम्यान सीमापार पेमेंटसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात मदत होईल. UPI-Paynow लिंक केल्यामुळे, भारत आणि सिंगापूरमधील रहिवासी रिअल-टाइम मनी ट्रान्सफर करू शकतात.