जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर व राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगर तर्फे गॅस सिलेंडर दरवाढी तसेच कांदा व कापसाला भाव मिळावा म्हणून महागाईची होळी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस महानगर व युवकच्या वतीने केंद्र सरकार राज्य सरकार जुमलेबाज सरकार विरोधात जिल्हा राष्ट्रवादी कार्यालय आकाशवाणी चौक याठिकाणी 50 खोके लाऊन गॅस सिलिंडर दरवाढीच्या व कापसाला व कांद्याला भाव वाढून मिळण्यासाठी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा दिल्या. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला व 50 खोके लाऊन महागाई विरोधातील होळीचे दहन जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकु चौधरी, इब्राहिम तडवी, राजू मोरे, किरण राजपूत, रमेश बाऱ्हे, सहील पटेल, रफिक पटेल, ललित नारखेडे, चेतन पवार, कुंदन सूर्यवंशी, सचिन साळुंखे, सिद्धार्थ गव्हाणे, हितेश जावळे, अशोक सोनवणे, राहुल टोके , विशाल देशमुख आदी उपस्थित होते.