मुंबई: गेल्या महिन्यात सोन्यात मोठी दरवाढ झाल्याचे पहायला मिळाले. सोन्याने 59,000 हजारांपर्यंत उच्चांक गाठला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून सोन्याचे भाव चढउतार सुरु असून, आजवरच्या विक्रमी भाव त्याने गाठला नाही. त्यामुळे होळीच्या पर्वावर स्वस्तात सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. विक्रमी भावापेक्षा शुद्ध सोने 2300 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे. गेल्या काही महिन्यात सोने 50,000 रुपयांवरुन 59,000 रुपयांच्या आसपास पोहचले होते. तर चांदीनेही मोठा पल्ला गाठला होता.
सध्या सोन्याचा भाव 56,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 67,000 रुपये प्रति किलो आहे. गेल्या आठवडाभरात दोन्ही किंमतीत धातूंमध्ये चढउतार दिसून आला. प्रत्येक दिवशी सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसून येत आहे. काही दिवस सोन्याच्या भाव वधारले तर काही दिवस भावात नरमाई दिसून आली. शुद्ध सोन्यात 150 रुपयांची वाढ दिसून आली. तर चांदीने प्रचंड उसळी घेतली आहे. किलोमागे चांदीचा भाव 3,000 रुपयांनी वधारला आहे.
22 कॅरेट सोन्याचा भाव स्थिर
गुडरिटर्न्सनुसार 22 कॅरेट सोन्याचा भाव गेल्या आठवड्यापासून फारसा बदलला नाही. 22 कॅरेटचा भाव 51,950 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत वधारुन ती 56,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. गेल्या पंधरवाड्यात 25 फेब्रुवारी रोजी शुद्ध सोन्याचा भाव 56,330 रुपये होता. तर 22 कॅरेटचा भाव 51650 रुपये होता. आजच्या भावाशी तुलना केली असता, 22 कॅरेटच्या भावात 300 रुपयांची तर 24 कॅरेट सोन्यात 220 रुपयांची वाढ झाली आहे. पण 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोने 58,880 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. त्यामानाने सध्या सोने अजूनही स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.
राज्यातील प्रमुख शहरांतील दर
गुडरिटर्न्सनुसार,मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,850 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,550 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,850 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,550 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,850 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,550 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,880 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,580 रुपये आहे.