जळगाव : शहरात चोऱ्या-घरफोड्यांचे सत्र कायम असून खोटे नगरजवळील वाटीका आश्रम परीसरातील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 40 हजारांचा मुद्देमाल लांबवला. याबाबत सोमवारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोविंद सुकदेव पाटील (वय 56, गुरूकृपा सोसायटी, वाटीका आश्रम जवळ, खोटे नगर, जळगाव) हे गुरुवार, 9 मार्च रोजी बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 40 हजारांचा मुद्देमाल लांबवला. गोविंद पाटील यांनी याबाबत जळगाव तालुका पोलिसांनी माहिती दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अनिल मोरे करीत आहे.