जळगाव: जेवणानंतर सोबतच्या सहकाऱ्याला पाण्याचा तांब्या मागितल्याचा राग आल्याने तरुणावर तीन तरुणांवर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील तांबापुर परिसरातील बिलाल चौकात शेख नाजीर शेख कदीर हा तरुण वास्तव्यास असून तो अभय नवले यांच्याकडे केटर्सचे काम करतो. याच ठिकाणी शुभम उर्फ प्रल्हाद शिंपी याच्यासह त्याचे दोन मित्र कामाला आहे. दि. 12 रोजी खोटे नगरस्टॉपजवळील दिपलक्ष्मी मंगल कार्यालयात जेवण वाढण्याचे काम केले.
तालुका पोलिसात गुन्हा दाखल
त्यानंतर सोबत जेवणाला बसलेले असतांना शुभमच्या मित्राने शेख नजिर शेख कदीर याला पाण्याचा तांब्या मागितला. त्याचा राग आल्याने शुभमसह त्याच्या मित्रांनी शेख नजीरसोबत वाद घालून त्याच्यासह मित्रांवर धारदार शस्त्राने वार करुन जखमी केले. यामध्ये शेख नजीर व त्याचा मित्र इमरान सरफरोश शहा जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी शेख नजीरच्या तक्रारीवरुन तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.