नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दलामार्फत (CRPF) एकूण 9 हजाराहून अधिक पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 28 मार्च 2023 पासून ऑनलाईन अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 एप्रिल 2023 आहे.
या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार CRPF च्या अधिकृत वेबसाइट crpf.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. CRPF कॉन्स्टेबल भरती 2023 साठी निवड ऑनलाइन परीक्षा, PST आणि PET, ट्रेड टेस्ट, DV आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे केली जाईल. तसेच, CRPF कॉन्स्टेबल अधिसूचना 2023 अंतर्गत अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जातील.
एकूण पदसंख्या
कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन) च्या एकूण पदांची संख्या – 9212
पुरुष – 9105 रिक्त जागा
महिला – 107 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता :
सीटी/ड्रायव्हर – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे हेवी ट्रान्सपोर्ट व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन्स असावे.
सीटी/मेकॅनिक मोटार वाहन – मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये किमान मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष तांत्रिक पात्रता: मेकॅनिक मोटार वाहनात 02 वर्षे ITI प्रमाणपत्र. याशिवाय उमेदवारांना संबंधित ट्रेडमधील 1 वर्षाचा अनुभवही असावा.
इतर पदांसाठी : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक व संबधीत क्षेत्रात ज्ञान.
निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, PST आणि PET, ट्रेड टेस्ट, DV आणि मेडिकल परीक्षेच्या आधारे केली जाणार.
पगार किती मिळणार
या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल-3 अंतर्गत वेतन म्हणून 21700- 69100 रुपये दिले जातील.
महत्वाच्या तारखा
CRPF कॉन्स्टेबलसाठी अर्जाची सुरुवातीची तारीख – 27 मार्च 2023
CRPF कॉन्स्टेबलसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023
CRPF कॉन्स्टेबलसाठी प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख – 20 जून ते 25 जून 2023
CRPF कॉन्स्टेबलसाठी परीक्षेची तारीख – 01 जुलै ते 13 जुलै 2023 यादरम्यान
अर्ज फी किती लागणार
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्या पुरुष उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. तसेच SC/ST, महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.