मुंबई : एका मुलीने तिच्या आईचा निर्दयीपणे खून केला असून मुंबईसारख्या शहरात ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर मुलीने आईच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर काही तुकडे घरातील पाण्याच्या ड्रममध्ये तर काही तुकडे कपाटात लपवले. इतकेच नाही तर आईच्या मृतदेहाच्या तुकड्यांसोबत ही मुलगी जवळपास 3 महिने त्याच घरात राहिली. तरीही कुणाला साधी भनकही लागली नाही. ही भयंकर घटना ऐकून सर्वच हैराण आहेत.
विविध ठिकाणी मृतदेहाचे तुकडे आढळले. मुंबईच्या रहिवासी भागात घडलेल्या या घटनेने पोलीसही हैराण झाले. मृतदेहाचे तुकडे प्लॅस्टिकच्या बॅगेत बंद होते. मंगळवारी रात्री मुंबईच्या काळाचौकी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने बहिणीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. तक्रार करणाऱ्या व्यक्तीने 55 वर्षीय बहिण वीणा जैन मागील 3 महिन्यापासून तिच्याशी बोलणे होऊ शकले नाही. पेरू कपाऊंडच्या इब्राहिम कासम बिल्डिंगमध्ये 23 वर्षीय मुलीसोबत वीणा राहतात. परंतु ना ती फोनवर भेटते आणि ना बोलणे होते. इतकेच नाही तर जेव्हा तिच्या घरी गेलो तेव्हा मुलगी रिम्पल काही बहाणे बनवून घरातून जायला सांगितले. या घटनेला 3 महिने उलटले असं त्याने तक्रारीत म्हटले आहे.
डिसेंबर 2022 मध्येच केला खून?
महत्त्वाचं म्हणजे वीणा जैन यांची हत्या डिसेंबर महिन्यात झाली असावी असा संशय पोलिसांना आहे आणि तेव्हापासून आरोपी रिंकल जैनने मृतदेह घरात लपवून ठेवला होता.
काय आहे नेमकी घटना?
मुंबईतील काळाचौकी पोलीस स्टेशन अंतर्गत लालबागमध्ये मंगळवारी (14 मार्च) रात्री अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लालबाग इथल्या इब्राहिम कासम इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये 53 वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये आढळला. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या 23 वर्षीय मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली. यात तिनेच आईचा खून केल्याचं समोर आलं. पोलिसांनी घरातून इलेक्ट्रॉनिक मार्बल कटर, कोयता आणि चाकू जप्त केला असून आरोपी मुलीने या धारदार शस्त्राच्या सहाय्याने महिलेच्या शरीराचे पाच तुकडे करुन ते प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून तिच्याच घरातील कपाटात आणि लोखंडी पाणीच्या टाकीत ठेवले होते.