पुणे (महेश झेंडे- प्रतिनिधी) : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने समोरील मालवाहू ट्रकला मागून जोरात धडक दिली. या अपघातात कारमधील तीन जण ठार झाले आहेत. मुंबई- पुणे महामार्गावर आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास आढे गावाच्या हद्दीत हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार क्र. (MH 04 JM 5349) ही आढे गावाजवळील किमी 82 जवळ भरधाव वेगात आली. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोर जाणारा ट्रक क्र. (RJ 09 JB 3638) ला या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की कार टँकर ट्रकच्या मागे रुतून बसली. या अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी होती.
कारमधील दोघांचा मृत्यू
अपघाताची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जात अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. दरम्यान, अपघात ठार झालेल्या नागरिकांची नावे अद्याप समजू शकली नाही. कारमधील चालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा व महामार्ग पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने वाहने बाजुला करत कार मधील सर्वांना बाहेर काढले.