यावल : तालुक्यातील किनगाव ते डांभुर्णी रस्त्यावर भरधाव वेगात जाणारे क्रुझर वाहन अनियंत्रीत होवून अपघात झाल्याने त्यात 12 जण जखमी झाले. यातील 25 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिसात कु्रझर चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
किनगाव येथून डांभुर्णीकडे क्रुझर (क्रमांक एम. एच. 19 बी. जे. 7412) ही जात असताना किनगाव गावाबाहेर भरधाव वाहन अनियंत्रीत होत अपघात घडल्याने 12 जण जखमी झाले. जखमींवर जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. यात उपचारादरम्यान बापू देविदास मोरे (25, रा.धंदाणे चिचगाव, ता.धुळे) या तरुणाचा मृत्यू झाला.
अपघाताचा गुन्हा दाखल
या प्रकरणी यावल पोलिसात देविदास पंढरीनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक शुभम पुंडलिक कोळी (डांभूर्णी) याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान करीत आहे.