रावेर (प्रतिनिधी) : अवैध डिंक वाहतूक करणारी मोटरसायकल व ४० किलो सलई डींक जप्त करण्यात आला आहे. वनविभागाने केलेल्या धडक कारवाईमुळे डींक तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
रावेर परिक्षेत्र मधील वन कर्मचारी शासकीय वाहनाने रात्री गस्त करून सापळा रचून केऱ्हाळा गावाजवळ कारवाई केली. केऱ्हाळा ते पिंप्री रस्त्याने अवैध गौण वनउपज (सलई डिंक) वाहतूक करणारे एक मोटार सायकलचा पाठलाग केला. यावेळी अंधाराचा फायदा घेत आरोपी मोटरसायकल सोडून फरार झाले आहे.
यांनी केली कारवाई
केलेल्या कारवाईत एक मोटरसायकल (एम. एच. 19, बीए. 0528) वाहन किंमत अंदाजे 30 हजार रुपये सलई डिंक 40 किलो 4,400 रुपये असा एकूण 34,400 किंमतीचा मुद्देमाल भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 (ब) 4252 अन्वये वनपाल अहिरवाडी प्रथम रिपोर्ट नोंदवून जप्त केला. सदर कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर अजय बावणे, वनपाल राजेंद्र सरदार, रवींद्र सोनवणे, अरविंद धोबी, वनरक्षक रमेश भुतेकर, वाहन चालक विनोद पाटील यांनी संयुक्तरित्या कारवाई केली. पुढील तपास वनपाल अहिरवाडी करीत आहे.