जळगाव: एसटी कामगारांची संघटना असलेल्या विभागीय संघटनेचे अध्यक्षपदी डॉ. अश्विन सोनवणे यांची नेमणूक झाली. एसटी कामगारांचे नेते व सुप्रसिद्ध वकील ॲड. गुणरत्ने सदावर्ते व ॲड जयश्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जळगाव, धुळे, नंदुरबार, नासिक या चारही जिल्ह्यातून एस.टी. कर्मचारी जनसंघाच्या परिवर्तन पॅनलचे १७ उमेदवार निवडून आले आहेत. त्यात जिल्हा विभागीय अध्यक्ष व माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी महत्वाची भुमिका निभावली. त्यांची ही कामगिरी लक्षात घेता, विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्याही समस्या असतील, त्या आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून सोडवू अशी ग्वाही दिली.