बोदवड : बोदवडसह परीसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह अनेक भागात गव्हासह हरभरा पिकाला मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तालुक्यातील लोणवडाडी येथील शेतकऱ्याचा मका जमीनदोस्त झाला असून गव्हासह हरबरा ओला झाल्याने शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे बोदवड तालुक्यात सर्वाधिक मका पिकाला फटका बसला आहे.
बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागात गुरुवारी रात्री अचानक जोरदार वादळी पाऊस झाल्याने मका पिकाचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला मका शेतातच खराब झाला झाला असून शेतकर्यांच्या शेताचे पंचनामे करून शेतकर्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा असताना राज्य कर्मचार्यांच्या संपामुळे मका पिकांचे नुकसान करण्यास दिरंगाई होणार आहे. शास व प्रशासनाने याबाबत दखल घेण्याची अपेक्षा आहे.