मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस लाच प्रकरणी बुकी अनिल जयसिंघानी याला पोलिसांनी गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. या अगोदर त्यांची मुलगी सध्या अनिक्षा जयसिंघानी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याच प्रकरणात भाजपाचे मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी एक सूचक ट्विट केले असल्याचे पाहायला मिळत आहे.
मोहित कंबोज यांनी अमृता फडणवीस यांच्या प्रकरणात एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अनिल जयसिंघानीला उद्धव ठाकरेंचा फ्रंट मॅन असे म्हटले आहे. त्यासोबतच ठाकरे आणि माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सूचक इशारा दिला आहे. आपल्या ट्वीटमध्ये मोहित कंबोज म्हणतात,”उद्धव ठाकरेंचे फ्रंट मॅन बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि आणि एक माजी पोलीस आयुक्त तुम्ही तुमचे दिवस मोजायला सुरुवात करा. तुमचं सत्यही लवकरच उघडं पडेल. जे लोक दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात, ते स्वतःच एक दिवस त्या खड्ड्यामध्ये पडतात”.असे म्हटले आहे.
सात वर्षांपासून फरार होता जयसिंघानी
दरम्यान, जयसिंघानी गेल्या सात वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल होते. अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणानंतर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर आज त्याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा हिला पोलिसांनी अटक केली आहे.
कोण आहे अनिल जयसिंघानी?
अनिल जयसिंघानी हा उल्हासनगरमधला क्रिकेट बुकी आहे. २०१० मध्ये अनिल जयसिंघानी छोटा बुकी म्हणून ओळखला जात होता. २०१० मध्ये बेटिंग करताना अनिल जयसिंघानीला अटक केली गेली होती. १९९५ ला अनिल जयसिंघानीने काँग्रेसच्या तिकिटावर उल्हासनगर पालिका निवडणूकही लढवली होती. २००२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनिल जयसिंघानीने प्रवेश केला. अनिल जयसिंघानीचे बड्या राजकीय नेत्यांशी संबंध, तसेच पोलीस अधिकाऱ्यांशीही चांगले संबंध आहेत. अनिल जयसिंघानी हा मागच्या सात-आठ वर्षांपासून फरार होता अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनीच सभागृहात दिली. अनिल जयसिंघानीच्या विरोधात विविध १५ गुन्ह्यांची नोंद आहे.