नवी दिल्ली : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) 200 पदांची भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेद्वारे कनिष्ठ सहाय्यक-सह-टंकलेखकाची रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment.nta.nic.in वर जाऊन या भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवार 20 एप्रिल 2023 पर्यंत भरतीसाठी अर्ज करू शकतील.
सहाय्यक-सह-टंकलेखकाच्या 200 पदांपैकी 83 पदे अनारक्षित, 29 अनुसूचित जाती, 12 अनुसूचित जमाती, 55 OBC आणि 21 EWS साठी निश्चित करण्यात आली आहेत. या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराला 40 शब्द प्रति मिनिट या वेगाने इंग्रजी टायपिंग आणि 35 शब्द प्रति मिनिट या वेगाने हिंदी टायपिंग अवगत असावे.
वयोमर्यादा :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. भरतीसाठी अर्ज करणार्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.
निवड अशी होईल
संगणक आधारित लेखी चाचणी आणि टायपिंग चाचणीच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षेत उमेदवारांकडून 150 गुणांचे 150 प्रश्न विचारले जातील. त्या सोडवण्यासाठी उमेदवारांना दोन तासांचा अवधी देण्यात येणार आहे.
इतका पगार मिळेल
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपये पगार दिला जाईल.
अर्ज कसा करायचा
– सर्वप्रथम सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment.nta.nic.in वर जावे.
– यानंतर होमपेजवर IGNOU JAT 2023 च्या लिंकवर क्लिक करा.
-त्यानंतर उमेदवाराच्या अर्जामध्ये विचारलेले सर्व तपशील भरा.
– यानंतर, उमेदवारांनी विचारलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
– त्यानंतर उमेदवारांनी अर्जाची फी भरावी.
– शेवटी, अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवाराने फॉर्मची प्रिंट आउट घ्यावी.
महत्वाच्या तारखा
अर्ज भरण्यास सुरूवात : 22 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023
अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची तारीख: 21 एप्रिल 2023