भुसावळ : तालुक्यातील दीपनगर परिसरात दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. वरणगाव पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहे.
तालुक्यातील तळवेल येथील मिलींद भागवत राणे (वय ४०) हा तरुण भुसावळ येथून दुचाकी क्र. एमएच १९ सी ७१७१ ने घराकडे जात होता. दिपनगर जवळील कपील वस्तीलगत अज्ञात वाहनाने दुचाकीस मागून जोरदार धडक दिल्याने मिलीद राणे याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. परिणामी, त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
भुसावळ पालिकेत होते नोकरीला
मयत राणे हे भुसावळ नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात कंत्राटी कामगार होते. त्याच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.