जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव येथील वृध्दाच्या खून करुन पुलाखाली मृतदेह फेकून देण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मयताच्या सुनेसह एका तरूणाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील किनगाव येथील भीमराव शंकर सोनवणे (वय ६०) या वृद्धाचा मृतदेह किनगाव चुंचाळे रस्त्यावरील नाल्याचे पुलाखाली शुक्रवारी आढळून आला होता. याबाबत खुन झालेल्या व्यक्तिच्या मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांनी यावल पोलीस ठाण्यात खून झाल्याची फिर्याद दिली होती.
सुनेकडे शरीर सुखाची मागणी…
याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असतांना त्यांना सुनेवर संशय आला. यातून तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. यात भीमराव सोनवणे यांनी आपल्या सुनेकडे शरीर सुखाची मागणी केली असता सुनेने नाकारली. या वादातुन सुनेने संशयित आरोपी जावेद शाह अली शाह, (वय २८ रा . वरणगाव ह.मु. उदळी तालुका रावेर) याच्या मदतीने सासरे भिमराव सोनवणे यांचा धारदार हत्याराने खुन केल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.