नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष 2023-24 सुरू झाल्यामुळे देशात अनेक नियम आणि कायदे बदलत आहेत. एप्रिल महिन्याने नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला बँकेतही काही काम असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. एप्रिल महिन्यात 30 दिवसांपैकी बँका जवळपास 12 दिवस बंद राहणार आहेत. येथे तुम्ही सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहू शकता.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला बँक सुट्ट्यांची यादी जारी करते. यामध्ये वेगवेगळ्या राज्यांनुसार वेगवेगळ्या दिवशी बँका बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या 12 दिवसांच्या सुट्यांमध्ये महत्त्वाचे दिवस, जयंती, सण आणि एप्रिलमध्ये येणार्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश होतो. जाणून घ्या कोणत्या दिवशी सुट्टी असणार आहे.
एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी
1 एप्रिल (शनिवार) बँक अकाऊंटचं वार्षिक क्लोजिंग
2 एप्रिल (रविवार) साप्ताहिक सुट्टी
4 एप्रिल (मंगळवार) महावीर जयंती
7 एप्रिल (शुक्रवार) गुड फ्रायडे
8 एप्रिल (शनिवार) महिन्यातील दुसरा शनिवार
9 एप्रिल (रविवार) साप्ताहिक सुट्टी
14 एप्रिल (शुक्रवार) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
16 एप्रिल (रविवार) साप्ताहिक सुट्टी
22 एप्रिल (शनिवार) रमजान ईद, दुसरा शनिवार
23 एप्रिल (रविवार) साप्ताहिक सुट्टी
30 एप्रिल (रविवार) साप्ताहिक सुट्टी