जळगाव : शहरातील हॉटेलमध्ये आपल्या कुटुंबियांसह भोजनासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चौघांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश मधुकर पाटील हे जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन वर्षांपासून कार्यरत आहेत. मंगळवारी २८ मार्च रोजी रात्री गणेश पाटील हे फॅमिलीसोबत नवीन बसस्थानकजवळील हॉटेल रिगल येथे जेवणासाठी गेले होते. त्यांच्या बाजूच्या टेबलावर कृष्णा नरेंद्र पिंगळे (वय-२०) रा. रायसोनी नगर, भावेश अनिल चौधरी (वय-१९) रा. गणेशवाडी, मयंक राजेंद्र चौधरी (वय-२७) आणि गोपाल नवल असे चार जण बसले होते.
फायटरने मारहाण
यावेळी चौघांपैकी एकाने पाण्याची बाटली मारून फेकली. त्यावरून गणेश पाटील हे चौघांना समजविण्यास गेले असता. चौघांनी गणेश पाटील यांच्याशी धक्काबुक्की करत जुन्या वादातून मारहाण करत म्हणाले की तू आम्हाला यापुर्वी अटक केली होती, आता तू एकटा सापडला आहे, तू काहीच करून शकत नाही अशी धमकी देवून यातील एकाने फायटरने तोंडावर मारहाण करून दुखापत केली.
दोघांना केली अटक
यानंतर जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून कृष्णा पिंगळे, भावेश चौधरी आणि मयंक चौधरी यांना जागेवरच अटक केली तर गोपाल नवल हा फरार झाला आहे. याप्रकरणी गणेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.