मुंबई : एप्रिल महिना आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो. नवीन आर्थिक वर्षही याच महिन्यात सुरू होते. अशा परिस्थितीत यासोबतच असे अनेक मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. एप्रिल महिन्यात होणा-या आर्थिक बदलांबद्दल जाणून घेऊया.
हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांवर बंदी
1 एप्रिल 2023 पासून भारतात सोन्याच्या विक्रीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. 1 एप्रिलपासून ज्वेलर्स फक्त तेच दागिने विकू शकतील ज्यावर 6 अंकी HUID क्रमांक नोंदणीकृत असेल. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ग्राहक विभागाने 18 जानेवारी 2023 रोजी हा निर्णय घेतला आहे. पूर्वी HUID ऐच्छिक होता.
या गाड्या महाग होणार
भारत स्टेज-2 च्या अंमलबजावणीमुळे ऑटोमोबाईल कंपन्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू, टोयोटा आणि ऑडी यांसारख्या अनेक कंपन्यांच्या वाहनांच्या किमती वाढणार आहेत. सर्व कंपन्यांनी 1 एप्रिल 2023 पासून त्यांचे नवीन दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या विमा पॉलिसींवर कर भरावा लागणार
तुम्ही 5 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक प्रीमियम पॉलिसी खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारने 2023 च्या अर्थसंकल्पात घोषणा केली होती की 1 एप्रिल 2023 पासून वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम असलेल्या विमा योजनेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागेल. त्यामुळे 5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक प्रिमियम पाॅलिसी असलेल्यांना कर भरावा लागणार आहे.
दिव्यांगजनांसाठी यूडीआयडी अनिवार्य
आता १ एप्रिलपासून दिव्यांगांना युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड (यूडीआयडी) क्रमांक सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे UDID नाही, त्यांना त्यांच्या UDID नावनोंदणी क्रमांकाची माहिती द्यावी लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानंतरच तो 17 सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो.
NSE वरील व्यवहार शुल्कातील 6% वाढ मागे
राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) यापूर्वी कॅश इक्विटी आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमधील कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांवर 6% शुल्क आकारले होते, जे आता 1 एप्रिलपासून मागे घेतले जाईल.
एलपीजी आणि सीएनजीच्या किमती
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्या गॅस आणि सीएनजीच्या दरात बदल करतात. अशा स्थितीत व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत दिलासा मिळतो का? की त्यात वाढ नोंदवली जाते, हे पाहावे लागेल.
अनलिंक पॅन निष्क्रिय होईल
CBDT ने पॅन कार्डशी आधार क्रमांक लिंक करण्यासाठी 31 मार्च 2023 पर्यंत अंतिम मुदत आहे. अशा स्थितीत जर तुम्ही दोन्ही लिंक न केल्यास पॅन निष्क्रिय केले आणि तुम्ही बँकेसह आयकर रिटर्नची कामे करू शकणार नाही.