रावेर : तालुक्यातील केर्हाळा बुद्रूक येथील संदीप सीताराम बावीस्कर (वय 35) यांनी दारूच्या नशेत घराच्या मागील भागात असलेल्या शौचालयाच्या लोखंडी गजाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
मुरलीधर बाविस्कर यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुनील वंजारी पुढील तपास करीत आहे.