नवी दिल्ली : देशात गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मागील काही दिवसात या भावात घसरण पण झाली. परंतु आता पुन्हा सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. सोन्याने सर्वात अगोदर 2 फेब्रुवारी रोजी विक्रम केला होता. त्यानंतर सोन्याने 19 मार्च रोजी 60,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. पुन्हा सोन्यात घसरण झाली. आता सोने पुन्हा 60,000 रुपयांच्या घरात गेले आहे. 2 फेब्रुवारी रोजी एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता. अजून हा विक्रम तुटला नाही. पण चांदी 73,300 रुपयांच्या आतबाहेर आहे.
आयबीजीएने जाहीर केलेल्या दरानुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,715 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 59,476 रुपये आहे. बुधवारी सोने 370 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढले होते. हा भाव 59335 रुपये प्रति तोळा होता. मंगळवारी सोने 58965 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सोने सातत्याने रेकॉर्ड तयार करत आहे. तज्ज्ञांच्या मते, सोने लवकरच 61,000 रुपयांचा टप्पा गाठू शकते.
सोन्यात गुंतवणूक फायद्याची?
गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,150 रुपये होती. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 60,150 रुपये होता. मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,000 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,000 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,000 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,000 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,030 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,030 रुपये आहे.