जळगांव : मनपाच्या माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक राजेंद्र घुगे-पाटील यांची भाजपा गटनेते पदी निवड करण्यात आली आहे.
राजेंद्र घुगे-पाटील यांची भाजपा गटनेते पदी निवड झाल्याबद्धल जळगांव शहराचे आमदार तथा भाजपा जळगांव ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश(राजुमामा)भोळे व भाजपा जळगांव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी सत्कार केला. त्याप्रसंगी भाजपा जळगांव महानगर जिल्हा संघटन सरचिटणीस तथा नगरसेवक विशाल त्रिपाठी, जिल्हा सरचिटणीस राधेश्याम चौधरी व जिल्हा सरचिटणीस महेश जोशी आदी उपस्थित होते.