जळगाव : जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन वाढण्यासाठी पक्षकडून संघटनात्मक नियुक्त्या केल्या जात आहे. शिवसेना महानगर समन्वयक पदी सोहम विसपुते व राहुल नेतलेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अजिंठा विश्रामगृह येथे पाणीपुरवठा तथा पालकमंत्री शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेची बैठक झाली. यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते शिवसेना महानगर समन्वयकपदी सोहम विसपुते व राहुल नेतलेकर याना नियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी उपस्थित सभागृह नेते ललित कोल्हे, महिला संपर्क प्रमुख सरिता कोल्हे, महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, संघटक दिलीप पोकळे, युवासेना महानगर प्रमुख हर्षल मावळे, नगरसेवक गजानन देशमुख, आशुतोष पाटील, प्रवीण कोल्हे, उमेश सोनवणे आदी उपस्थित होते.